अमृतसर -कोरोना विषाणूच्या फैलावामुळे पाकिस्तानात अडकलेले 208 भारतीय नागरिक चार महिन्यानंतर मायदेशी परतले आहेत. दोन्ही देशातील अटारी वाघा सीमेवरून नागरीक भारतात परतले. मागील दोन दिवासांपासून पाकिस्तानात अडकलेल्यांना माघारी आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाकिस्तानात अडकलेले 208 भारतीय अटारी सीमेवरून मायदेशी परतले - Attari Wagah border
मागील चार महिन्यांपासून अनेक भारतीय पाकिस्तानात अडकले होते. त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मागील चार महिन्यांपासून अनेक भारतीय पाकिस्तानात अडकल्याची माहिती पोलीस अधिकारी अरुणपाल सिंह यांनी दिली. 25 जूनला 204 तर 26 जूनला 217 नागरिकांना माघारी आणण्यात आले. तर आज 208 नागरिक मायदेशी परतले, असे सिंह यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील 25, जम्मू काश्मीरातील 2, उत्तर प्रदेश 32, राजस्थान 39, पंजाब 34, दिल्ली22, मध्यप्रदेश 15, हरियाणा 15, तेलंगाणा 9, कर्नाटका 4, चंदिगड 4, तामिळनाडू 6, छत्तीसगड 6, पश्चिम बंगाल 3, उत्तराखंड 2 हिमाचल प्रदेश 2, बिहारमधील 1 व्यक्तीचा समावेश आहे.