नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी पवनने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती.
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.