महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 24, 2019, 12:16 PM IST

Updated : Jun 25, 2019, 9:05 AM IST

ETV Bharat / bharat

जवानांनी ग्वाल्हेर एअरबेसवर जागवल्या कारगिल विजयाच्या आठवणी

१९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. त्याच निमित्ताने आज सोमवारी भारतीय वायू सेना कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत आहे.

कारगिल

नवी दिल्ली - भारताने १९९९ मध्ये आजच्याच दिवशी पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने आज भारतीय वायू सेना कारगिल युद्धाला 20 वर्षे पुर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत आहे.


भारतीय वायू सेनेने वीरमरण पत्करलेल्या जवानांची आठवण म्हणून ग्वाल्हेर एअर बेसवर टायगर हिलचे एक प्रतिकात्मक चित्रण प्रस्तुत केले आहे. याचबरोबर 'ऑपरेशन विजय' दरम्यान वापरण्यात आलेले मिराज 2000 आणि इतर विमानांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.


दरम्यान 25-27 जुलैपर्यंत संपूर्ण देशभर याच प्रकारचे अनेक कार्यक्रम करण्याची भारतीय वायू दलाची योजना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वरिष्ठ एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी भारतीय वायुसेनाच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर 1999 साली कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून, आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन विजय' ची सुरवात केली होती.


भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले होते. यावेळी भारतीय सैन्याने 24 जून 1999 मध्ये टायगर हिलवर पाकिस्तानी घुसखोरांना पराभूत केले होते.

Last Updated : Jun 25, 2019, 9:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details