नवी दिल्ली -भारतात कोरोनाचे 8 हजार 356 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 20 टक्के रुग्णच अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण रुग्णांपैकी 20 टक्के म्हणजे 1 हजार 256 रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून त्यांची अतिदक्षता विभागात काळजी घेण्यात येत आहे. ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण यातून सरकारची तयारी दिसून येते, असे सचिव लव अगरवाल म्हणाले.
भारतातील कोरोनाचे 20 टक्के रुग्णच अतितक्षता विभागात, आरोग्य मंत्रालय - india corona news
देशात 29 मार्चला फक्त 979 रुग्ण होते मात्र, आता 8 हजार 356 रुग्ण संख्या झाली आहे. 9 तारखेच्या आकडेवारीनुसार जर आपल्याला 1 हजार 100 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 85 हजार खाटांची उपलब्धता आहे.
लव अगरवाल सचिव आरोग मंत्रालय
देशात 29 मार्चला फक्त 979 रुग्ण होते मात्र, आता 8 हजार 356 रुग्ण संख्या झाली आहे. 9 तारखेच्या आकडेवारीनुसार जर आपल्याला 1 हजार 100 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 85 हजार खाटांची उपलब्धता आहे. आज जर आपल्याला 1 हजार 671 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 1 लाख 5 हजार खाटा कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या 601 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती अगरवाल यांनी दिली.