आग्रा - उत्तर प्रदेशमधील दिल्ली हावडा रेल्वे लाईनवरील रेल्वेचा अपघात झाला आहे. बरहन रेल्वे स्थानक आणि मितावली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेखाली चिरडून 20 गायी दगावल्या आहेत.
हेही वाचा -महिला बस वाहकावर दोन अज्ञातांचा अॅसिड हल्ला..
रेल्वेखाली 20 गायी चिरडल्या, दिल्ली-हावडा मार्गावर अपघात - रेल्वेखाली चिरडून 20 गायी दगावल्या
उत्तर प्रदेशमधील दिल्ली हावडा रेल्वे लाईनवरील रेल्वेचा अपघात झाला आहे.
गायी रेल्वेखाली चिरडल्या गेल्यामुळे गायींचे मांस रेल्वेच्या चाकामध्ये अडकले आणि गाडीत बिघाड झाला. त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पाणी व खाद्यान्नाअभावी प्रवाशांचे हाल झाले. या अपघातामध्ये गाडी रुळावरुन घसरली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा -breaking news उन्नाव बलात्कार प्रकरण: मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा
विशेषत: हावडा-दिल्ली आणि हावडा-मुंबई स्थानकांदरम्यान ट्रॅकवर कुंपण घालण्याच्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. कुंपण घालण्याचे कामही काम सुरू झाले असल्याचे उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अजितकुमार सिंह यांनी सांगितले.