महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'टिक-टॉक' व्हिडिओ बनवण्यासाठी खरेदी केलं पिस्तुल; दोघांना अटक

'टिक-टॉक'वर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळाव्यात म्हणून २५ हजार रूपयांना आपण हे पिस्तुल खरेदी केल्याचे या दोघांनी कबूल केले. त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात येणार असून, हे पिस्तूल त्यांनी कुठून मिळवले याचा तपास सुरू असल्याची माहिती मंदसौरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

2 youth arrested for buying an illegal pistol to make tik-tok video

By

Published : Nov 20, 2019, 11:08 AM IST

Updated : Nov 20, 2019, 1:10 PM IST

भोपाळ - मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगढ गावात राहणाऱ्या दोघांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. एका व्हायरल झालेल्या 'टिक-टॉक' व्हिडिओमध्ये, राहुल आणि कन्हैय्या हे दोन मित्र खरीखुरी पिस्तुल चालवताना दिसून येत होते. दोघांकडून अनधिकृतरित्या खरेदी केले गेलेले हे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

'टिक-टॉक'वर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळाव्यात म्हणून २५ हजार रूपयांना आपण हे पिस्तुल खरेदी केल्याचे या दोघांनी कबूल केले. त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात येणार असून, हे पिस्तूल त्यांनी कुठून मिळवले याचा तपास सुरू असल्याची माहिती मंदसौरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

पालकांनी आपल्या मुलांना समाजमाध्यमांवर चुकीच्या गोष्टी पोस्ट करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. तसेच, मुलांनीही लाईक्सच्या हव्यासासाठी कोणतीही टोकाची भूमीका घेऊ नये, असे आवाहनही पोलीस अधिक्षकांनी केले.

हेही वाचा :दोन भारतीयांना पाकिस्तानमध्ये अटक, परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपाची प्रतिक्षा

Last Updated : Nov 20, 2019, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details