श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहदीन दहशतवादी संघटनेशी संबधीत २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील गांदेरबल जिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्त सूचनेच्या आधारावर कारवाई केल्याचे पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक - हिजबूल मुजाहदीन संघटना
जम्मू काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहदीन दहशतवादी संघटनेशी संबधित २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गुप्त सूचनेच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
चांदी खटाना आणि वाजिद अली खटना, अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही राजौरी जिल्ह्यातील जंडीवाडा येथील रहिवासी आहेत. हे दोघेजण इतर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे, दहशतवाद्यांना मार्गदर्शन करणे तसेच दहशतवाद्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम या दोघांना देण्यात आले होते. दोघांकडून शस्त्रास्त्रे आणि दोरुगोळाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.