चैन्नई - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे दोन विमाने 350 भारतीयांना दुबईतून घेऊन आले आहे.
पहिले विमान 182 भारतीयांना घेऊन चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर काही काळातच दुसरी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX540 चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. हे विमान दुबईवरून १७७ प्रवासी घेऊन भारतात आले आहे.