कोलकाता- भारतीय नौदलातील आयएनएस नेताजी सुभाषच्या दोन नाविकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या दोघांमध्येही तापाची लक्षणे दिसली. यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याचे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
आयएनएस नेताजी सुभाषच्या दोन नाविकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवले, तापाची लक्षणे - आयएनएस नेताजी सुभाषच्या दोन नाविकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवले
भारतीय नौदलातील आयएनएस नेताजी सुभाषच्या दोन नाविकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. विंग कमांडर एम एस हूडा यांनी याबद्दलची माहिती दिली.
आयएनएस नेताजी सुभाष
या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. विंग कमांडर एम एस हूडा यांनी याबद्दलची माहिती दिली. या दोन्ही व्यक्तींचे कोरोना अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. मात्र, ठरलेल्या नियमांनुसार संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, याठिकाणी किती जणांना क्वारंटाईन केले आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही