महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजधानी दिल्लीतही कांद्याची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद - प्याज की कीमत

देशाची  राजधानी असलेल्या दिल्लीमधील हरिनगर येथे कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

कांद्याची चोरी
कांद्याची चोरी

By

Published : Dec 17, 2019, 1:49 PM IST

Updated : Dec 17, 2019, 2:40 PM IST

नवी दिल्ली - कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. कांद्याला डॅालरपेक्षा जास्त भाव आला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रीत झाले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील हरीनगर येथे कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. कांदा चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कांदा चोरी, सीसीटीव्हीत कैद झाली घटना

कांद्याच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हरिनगर येथील दुकानासमोर ठेवलेल्या 2 कांद्याच्या गोण्या 3 चोरांनी भरदिवसा चोरल्या आहेत. कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणखी १२ हजार ६६० टन कांदा आयात करणार आहे. हा कांदा देशात २७ डिसेंबरला पोहोचणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Last Updated : Dec 17, 2019, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details