भोपाळ - मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील गोपाळ मंदिर परिसरात विषारी दारू पिऊन सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आणखी काही जणांचा प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मध्य प्रदेश : उज्जैनमध्ये विषारी दारू पिऊन 7 जणांचा मृत्यू - उज्जैनमध्ये दारू पिऊन 7 जणांचा मृत्यू
उज्जैन जिल्ह्यातील गोपाळ मंदिर परिसरात विषारी दारू पिऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर चार मृतदेहांचे शवविच्छेदन आज केले जाणार आहेत.
मध्य प्रदेश
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला पडलेले दारूडे पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.