जम्मू- राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर अन्य एक दहशतवादी जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री काही दहशवतादी एलओसीजवळ घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी भारतीय लष्कराने गोळीबार करून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. भारतीय लष्कराच्या सुत्रांनी या चकमकी बाबतची माहिती दिली.
जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवर २ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा - Army foils infiltration bid
नौशेरा सेक्टरमधून काही दहशतवाद्यांचा गट सीमारेषा ओलाडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या या हालचाली लक्षात येताच जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर काही वेळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर त्या ठिकाणी एक विस्फोट झाला. एखाद्या दहशतवाद्याचा भूसुरुंगावर पाय पडल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. या स्फोटात दोन दहशतवादी ठार झाले तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
नौशेरा सेक्टरमधून काही दहशतवाद्यांचा गट सीमारेषा ओलाडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या या हालचाली लक्षात येताच जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर काही वेळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर त्या ठिकाणी एक विस्फोट झाला. एखाद्या दहशतवाद्याचा भूसुरुंगावर पाय पडल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. या स्फोटात दोन दहशतवादी ठार झाले, तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
घटना स्थळावरून मृतदेह अद्याप ताब्यात घेतले नाहीत. मात्र, चकमकीनंतर मागे हटलेल्या दहशतवाद्यांनी दोघांचे मृतदेह जाताना सोबत नेले असल्याची शक्यता आहे. आता नियंत्रण रेषेवर बंदोबस्त वाढवण्यात आला असून शोध मोहीम हाती घेतली असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.