अवंतीपुरा (जम्मू काश्मीर)- पुलवामा जिल्ह्यातील शर्शाली गावामध्ये सैन्यदल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दुसरीकडे बेईघपोरा येथे अतिरेक्यांशी चकमक सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान - भारतीय सेना
शर्शाली गावात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा मृत्यू झाला आहे.अतिरेक्यांनी प्रथम सुरक्षा दलांवर गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा दलाने गोळीबार केला.

बेईघपोरा येथेही सुरक्षा दल आणि अतिरेक्यांची चकमक सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. अतिरेक्यांचा एक म्होरक्या आणि त्याचे दोन साथीदार सैन्यदलाच्या जाळ्यात सापडले आहेत. पोलिसांनी मंगळवारी रात्री येथे सर्च ऑपरेशन सुरु केले होते. पोलिसांच्या या कारवाईवर वरिष्ठ अधिकारी नजर ठेऊन होते,असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. गोळीबार अजूनही सुरु असून अधिक माहिती उबलब्ध झालेली नाही. असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.