हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सरु असून, यामध्ये काही नियम हे शिथील करण्यात आले आहेत. अनेक राज्यात परराज्यातील कामगार, विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न सरु केले आहेत. श्रमीक रेल्वेद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलंगणामधून आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, ओरीसा, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम, मनीपूर येथे 150 रेल्वेने कामगार आणि विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे. जवळपास आत्तापर्यंत रेल्वे आणि बसने 2 लाख कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी परराज्यातील कामगार हे तेलंगणाच्या विकासाचे प्रतिनिधी आहेत असे म्हटले होते. तसेच त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांना सुखरुप घरी पोहोचवले जाईल असेही ते म्हटले होते. त्याप्रमाणे परराज्यातील कामगांरना सोडवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या कामगारांना घरी सोडण्याच्या कामामध्ये रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, जिल्हाधिकारी मेदचल व्यंकटेश्वरलू, डीसीपी मलकाजीगिरी रक्षिता आईपीएस जेसी प्रसाद यांचे मोठे योगदान आहे. या अधिकाऱ्यांसह त्यांच्या टीमने सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
बिहारमधून 300 लोक तेलंगणात
3 मे ला तेलंगणातून कामगारांना घेऊन बिहारमध्ये एक रेल्वे गेली होती. त्या रेल्वेमध्ये बिहारमधील खगारीया जिल्ह्यातून 300 कामगार हे परत तेलंगणामध्ये आले आहेत. हे सर्व कामगार राईस मीलमध्ये काम करणारे असल्याची माहितीही महेश भागवत यांनी दिली.