महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या चार महिन्यात दोन कोटी तरुण बेरोजगार, राहुल गांधींंचा मोदी सरकारवर हल्लाबोल - राहुल गांधी अपडेट न्यूज

कोरोनाच्या संसर्गामुळे चार महिन्यात दोन कोटी तरुणांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे भवितव्य अंधकारमय झाले.

delhi
राहुल गांधी

By

Published : Aug 19, 2020, 3:16 PM IST

नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या संसर्गामुळे चार महिन्यात दोन कोटी तरुणांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे भवितव्य अंधकारमय झाल्याचेही ते म्हणाले.

देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. कोरोना संसर्गामुळे चार महिन्यात दोन कोटी तरुण बेरोजगार झाले. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. ती फेसबुकवर द्वेष पसरवून लपून राहणार नाही, असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी केला.

फेसबुकवर द्वेष पसरवल्याबाबत एका माध्यमाने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस पक्षात जोरदार खडाजंगी सुरू आहे. राहुल गांधी यांच्या आरोपावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details