महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अवैध दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जोडप्याचा हल्ला; एका पोलिसाच्या हाताची बोटे तुटली - पोलिसांवर हल्ला

घरामध्ये अवैधरित्या दारु साठवल्याप्रकरणी छापा टाकायला गेलेल्या दोन पोलिसांवर एका जोडप्याने हल्ला केला. यामध्ये एका पोलिसाच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. ही घटना केरळमध्ये घडली आहे.

2-cops-attacked-by-couple-during-illicit-booze-raid-in-kerala-1-loses-fingers
अवैध दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जोडप्याचा हल्ला; एका पोलिसाच्या हाताची बोटे तुटली

By

Published : Apr 13, 2020, 10:52 AM IST

इडुक्की (केरळ):घरामध्ये अवैधरित्या दारु साठवल्याप्रकरणी छापा टाकायला गेलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर एका जोडप्याने हल्ला केला. यामध्ये एका पोलिसाच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. ही घटना केरळातील इडुक्की जवळील उप्पथरा येथील आहे.

जोडप्याने घरात दारु साठवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर थॉमस जॉन आणि अनिमॉन अयप्पन हे दोन अधिकारी जोडप्याच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले होते.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही त्या जोडप्याच्या घरी पोहोचलो आणि अवैधरित्या साठवलेली दारू जप्त केली. त्यावेळी ते जोडपे ती दारु ओतून देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना थाबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात थॉमस जॉन या पोलीस अधिकाऱ्याच्या हाताची दोन बोटे तुटली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. पंजाबमध्येही जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details