महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वडिलांचा निष्काळजीपणा मुलांच्या बेतला जीवावर, कारला चावी तशीच ठेवल्यानं कोसळली विहिरीत - car fallen in well

नागरिकांनी त्वरीत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले.

CAR FELL IN WELL
कार विहिरीत कोसळली

By

Published : Apr 29, 2020, 10:49 AM IST

Updated : Apr 29, 2020, 11:00 AM IST

जोधपूर - राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कार २६० फूट खोल विहिरीत पडल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. वडिलांच्या निष्काळजीपणामुळे दोन बालाकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील पीपाड शहरात काल (मंगळवारी) रात्री ही घटना घडली. १७ वर्षीय मुलगा आणि एक २ वर्षाचा लहानग्याचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

कार विहिरीत कोसळली

एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांना कारमध्ये बसवून ठेवले होते. तसेच गाडीची चावीही तशीच चालू होती. वडील तसेच निघून गेल्याने मुलांनी खेळता खेळता गाडी सुरू केली. त्यामुळे जवळच असलेल्या विहिरीत गाडी कोसळली. कार कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

नागरिकांनी त्वरीत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले. चार तासानंतर विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्हीही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

Last Updated : Apr 29, 2020, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details