महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#KanpurHorror प्रकरण : कानपूर पोलिसांकडून दोघांना अटक, चकमकीत मारल्या पायांवर गोळ्या - कानपूर जामीन हत्या

2018ला कानपूरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाचही जणांना २०१९ मध्ये जामीनावर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी वारंवार पीडितेच्या घरी जाऊन आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली. मात्र, तिने आणि तिच्या आईने हा गुन्हा मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी या दोघींवर हल्ला करत, पीडितेच्या आईची हत्या केली होती.

2 arrested for fatal attack on UP rape victim's mother
#KanpurHorror प्रकरण : कानपूर पोलिसांनी केली दोघांना अटक, चकमकीत मारल्या पायांवर गोळ्या

By

Published : Jan 19, 2020, 5:06 PM IST

कानपूर -एका बलात्कार पीडितेच्या आईचा निर्घृणपणे खून करणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात कानपूर पोलिसांना यश मिळाले आहे. परवेज आणि मोहम्मद अबीद या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर, त्यांना पायावर गोळ्या मारून अटक करण्यात आली. त्यांच्यावर सध्या कांशीराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण..?

2018ला कानपूरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाचही जणांना २०१९ मध्ये जामीनावर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी वारंवार पीडितेच्या घरी जाऊन आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली. मात्र, तिने आणि तिच्या आईने हा गुन्हा मागे घेण्यास नकार दिला.

या धमक्यांनी त्रासून गेल्याने नऊ जानेवारीला पीडिता आणि तिच्या आईने चाकेरी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक तक्रार नोंदवली. यामध्ये अटक करण्यात आलेल्या दोघांसह आणखी चार जणांची नावे होती. त्यामुळे संतापलेल्या या पाच जणांनी आणखी काही लोकांसह १० जानेवारीला पीडिता आणि तिच्या आईवर हल्ला केला, आणि त्यांना काठ्यांनी तसेच दगडांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर सात दिवसांनी, शुक्रवारी पीडितेच्या आईने रूग्णालयात आपले प्राण सोडले.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा जानेवारीला पीडिता आणि तिची आई या दाताच्या दवाखान्यात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यावेळी हे सर्व प्रकरण घडले तेव्हा मी आणि माझा मुलगा हे दुकानात होते, असेही ते पुढे म्हणाले. तर, पीडितेच्या भावाने सांगितले, की साधारणपणे दहा लोकांनी त्याच्या बहिणीवर आणि आईवर हल्ला केला होता. या आधीही आपल्यावरील गुन्हा मागे घेतला नाही, तर त्या दोघींना ठार मारू अशी धमकी आरोपींनी दिली होती, असेही त्याने सांगितले.

या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. आम्ही आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : बिहारमध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी; ४ कोटी २७ लाख नागरिकांचा सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details