महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात कोरोनाचे १९५ रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळात सर्वात जास्त फैलाव

महाराष्ट्रात ४४ जणांना तर केरळमध्ये २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, उत्तरप्रदेश, लडाख, राजस्थान आणि तेलंगाणा राज्यातही रुग्णांची संख्या वाढली आहे.

कोरोना संसर्ग
कोरोना संसर्ग

By

Published : Mar 20, 2020, 10:12 AM IST

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या १९५ वर गेली आहे. यामध्ये ३२ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अश्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगाणात ९ जणांना लागण झाली आहे.

कोरोनाग्रस्तांची यादी

काय आहे इतर राज्यातील परिस्थिती?

महाराष्ट्रात ४४ जणांना तर केरळमध्ये २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, उत्तरप्रदेश, लडाख, राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात प्रत्येकी १७, १५, १९, १०, ७, १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २० नागरिक उपचारानंतर पूर्णतहा: बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आरोग्य यंत्रणा कामाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशामध्ये तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक संशियितांवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशातील छोट्या मोठ्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधीत केले. येत्या २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. तसेच आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

भारताबाहेर २७५ जणांना कोरोनाची लागण

भारताबाहेर ज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रसार झाला आहे, तेथे तब्बल २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा भारतात संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त २५५ रुग्ण इराणमध्ये आहेत. तर संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीत ५ तर हाँगकाँग, कूवेत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ रुग्ण आहे. या सर्वांवर तेथे उपचार सुरू आहेत.

जगभरात अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, आठ हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ८८ हजार लोक यातून बरेही झाले आहेत. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे. इटलीमध्ये सर्वात जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून मृत्यू दर वाढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details