लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील तुरुंगामधील सुमारे १९१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या तुरुंगात जवळपास १,४०० कैदी आहेत. यानंतर राज्यभरातील तुरुंगांमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १,३७९वर गेली आहे.
बस्तीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ए. के. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कोरोना बाधित व्यक्तीनेच इतरांना औषध वाटप केल्यामुळे तुरुंगात कोरोनाचा प्रसार झाला असावा. प्राथमिक तपासात ही बाब उघड झाली आहे. यानंतर सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, वृद्ध कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.