तिरुवनंतपुरम - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर काही जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतत आहे. केरळमध्ये एका महिलेने अखेर कोरोनाशी युद्ध जिंकले आहे. महिलेची 19 वेळा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, अखेर 20 वी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
62 वर्षीय महिलेची कोरोनावर मात! अखेर 20 वी चाचणी निगेटिव्ह - कोरोना चाचणी निगेटिव्ह
केरळमध्ये एका महिलेने अखेर कोरोनाशी युद्ध जिंकले आहे. महिलेची 19 वेळा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, अखेर 20 वी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पठाणमथिट्टा येथील कोझेनच्चेरी जिल्हा रुग्णालयात 62 वर्षीय महिला गेल्या 45 दिवसांपासून कोरोनासंबंधित उपचार करुन घेत आहे. महिलेला मधूमेहाचाही त्रास होता. त्यांची आतापर्यंत तब्बल 19 वेळा कोरोना चाचणी घेण्यात आली होती. प्रत्येक वेळेस अहवाल निगेटिव्ह येत होता. मात्र, त्यांनी आजारावर मात केली असून त्यांची 20 वी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
महिलेच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान केरळमध्ये 438 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 323 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.