बंगळुरू - कोरोनाचे रुग्ण देशभरात वाढतच आहेत. कर्नाटक राज्यात आज नवीन 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधितांचा आकडा 692 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली.
कोरोना : कर्नाटकमध्ये आणखीन 19 बाधित रुग्ण आढळले, एकूण रुग्ण संख्या 692 - coronavirus cases in Karnataka
राज्यातील बाधितांचा आकडा 692 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली.

कोरोना
आत्तापर्यंत सापडलेल्या 692 बाधितांपैकी 29 जणांचा मृत्यू झाला असून 345 जण बरे झाल्याने रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 19 पैकी 13 बाधित रुग्ण बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे सापडले आहेत. यातील बहुतेकांना आधीच्या बाधिक रुग्णाच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे.
उर्वरित दक्षिण कन्नड जिल्ह्यात तीन, बंगळुरू शहर दोन आणि कलबुर्गी येथे एका रुग्णाला बाधा झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.