चेन्नई(तामिळनाडू)- वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशात अडकलेल्या 183 भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाद्वारे मंगळावारी रात्री भारतात आणले गेले, अशी माहिती एअर इंडिया विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मस्कत ओमान येथे अडकेल्या तामिळनाडू राज्यातील नागरिकांना चेन्नईतील अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यानंतर त्यांची छोट्या छोटया गटात विभागणी करून त्यांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एअर इंडिया आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस यांनी आतापर्यंत 64 विमानाद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले आहे. एअर इंडियाच्या 42 तर एअर इंडिया एक्सप्रेसच्या 24 विमानांद्वारे नागरिक भारतात आणले. अमेरिका, यु.के. बांग्लादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवैत, फिलिपाईन्स, संयुक्त अरब अमिराती येथून पहिल्या टप्प्यात 14800 भारतीयांना परत आणण्यात आले.
7 मे रोजी सुरु झालेल्या वंदे भारत मिशन अंतर्गत 6037 भारतीयांना एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या 31 विमान फेऱ्यांद्वारे मायदेशात आणले, असे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.