नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेचे पहिले सत्र आज सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
१७ व्या लोकसभेचे पहिले सत्र सुरू, पंतप्रधानांसह सदस्यांनी घेतली शपथ - pm modi
सभागृह सुरू होताच पारंपरिक पद्धतीने सर्व सदस्यांनी उभे राहात काही मिनिटांसाठी शांतता पाळली. शपथ घेण्यासाठी मोदींचे नाव उच्चारताच रालोआच्या सर्व खासदारांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. तसेच, 'मोदी, मोदी', 'भारतमाता की जय' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
सभागृह सुरू होताच पारंपरिक पद्धतीने सर्व सदस्यांनी उभे राहात काही मिनिटांसाठी शांतता पाळली. शपथ घेण्यासाठी मोदींचे नाव उच्चारताच रालोआच्या सर्व खासदारांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. तसेच, 'मोदी, मोदी', 'भारतमाता की जय' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मोदींनंतर अध्यक्षपदाचे अधिकारी के. सुरेश, ब्रिजभूषण शरण सिंग, बी. मेहताब यांनी शपथ घेतली. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनीही शपथ घेतली.
केरळातील वायनाड मतदार संघातून निवडून आलेले खासदार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. भोजनाच्या वेळेनंतर राहुल सभागृहात आले. रायबरेलीतून निवडून आलेल्या सोनियां गांधींसह ते सभागृहात पहिल्या रांगेत बसले होते. १६ व्या लोकसभेत राहुल दुसऱ्या रांगेत बसत असत. त्यांचे नाव पुकारल्यानंतर सोनिया यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.