महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मिशन वंदे भारत: बहारीनमध्ये अडकलेल्या 177 प्रवाशांना घेऊन विमान केरळमध्ये दाखल - Cochin airport baharin

वंदे भारत मिशनअंतर्गत विविध देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्याचे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. काल रात्री ११.३० च्या सुमारास विमान केरळमधील कोची विमानतळावर पोहचले.

Indians from Bahrain land at Cochin airport
मिशन वंदे भारत

By

Published : May 9, 2020, 8:54 AM IST

तिरुवअनंतपूरम -मध्य-पूर्वेतील बहारीन देशात अडकलेले १७७ भारतीय काल(शुक्रवार) एअर इंडियाच्या विमानाने केरळमध्ये पोहचले. वंदे भारत मिशनअंतर्गत विविध देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्याचे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. काल रात्री ११.३० च्या सुमारास विमान केरळमधील कोची विमानतळावर पोहचले.

यामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील प्रत्येकी ४ प्रवासी असून इतर सर्वजण केरळमधील विविध जिल्ह्यातील आहेत. बहारीनमध्ये कोणतीही चाचणी करण्यात आली नसल्याने कोची विमानतळवार सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ज्या रुग्णांमध्ये आजारी असल्याची लक्षणे आढळून आले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर सर्व प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना बसद्वारे त्यांच्या मुळ गावी पोहचविण्यात येणार आहे. प्रवाशांचे सर्व सामानही विमानातून खाली उतरविल्यानंतर निर्जुंतीकरण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details