नवी दिल्ली -कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासांत 1 हजार 752 रुग्ण आढळून आले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशभरातील रुग्णांचा आकडा 24 हजार 452 झाला आहे.
आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याने देशात 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 813 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 17 हजार 915 अॅक्टीव्ह केसेस आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 20.57 टक्के झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.