महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : विविध राज्यांत अडकलेले १७२ स्थलांतरित सिक्कीमला परतले - sikkim migrant labour

विविध राज्यांतून परत येणाऱ्या स्थलांतरितांची मेली आणि रंनगोप तपासणी नाक्यांवर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना राज्यात प्रवेश देण्यात आला.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 8, 2020, 2:33 PM IST

गंगटोक - भारताच्या ईशान्येकडील छोट्याश्या असलेल्या सिक्कीम राज्यातील स्थलांतरीत कामगारही देशाच्या विविध भागात अडकले आहेत. मात्र, इतर राज्यांप्रमाणे कामगारांची संख्या लाखांमध्ये अंत्यत कमी आहे. सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणी स्थळावर ६ हजार ८४ नागरिकांना नोंदणी केली आहे. काल (गुरुवार) देशातील विविध भागांत अडकेलल्या १७२ नागरिकांना माघारी आणण्यात आले आहे.

बसद्वारे माघारी येण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आत्तापर्यंत ३३५ नागरिकांना माघारी आणण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी परिसरात अडकून पडलेल्या नागरिकांना काल माघारी आणण्यात आले.

मेली आणि रंनपो तपासणी नाक्यांवर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना राज्यात प्रवेश देण्यात आला. घरी पोहचल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांतील लाखो कामगार देशातली विविध भागांत अडकून पडले आहेत. झारखंड राज्याने सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर ३ लाख नागरिकांनी माघारी राज्यात येण्यासाठी नोंदणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details