बरेली - हावडा-मुंबई मेलमधून मानवी तस्करी करण्यात येणाऱ्या ३३ मुलांना वाचवल्यानंतर अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. आता मालदा-आनंदविहार या आवड्यातून एकदा चालणाऱ्या गाडीतून तब्बल १७० मुलांना खाली उतरवण्यात आले आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बरेली जंक्शन येथून या मुलांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले. याआधी गुरुवारी ३३ मुलांची छत्तीसगड येथून सुटका करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशात मानवी तस्करीच्या संशयाने १७० मुलांना रेल्वेतून उतरवले - uttar preadesh
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बरेली जंक्शन येथून या मुलांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले. याआधी गुरुवारी ३३ मुलांची छत्तीसगड येथून सुटका करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश
रेल्वे पोलिसांनी २ हून अधिक डबे लहान मुलांनी भरलेले असल्याची सूचना मिळाली होती. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी या सर्व मुलांना रेल्वेतून खाली उतरवले. ही सर्व मुले बिहार येथील आहेत. या मुलांसोबत असलेल्या पालकांची चौकशी केल्यानंतर ही मुले मदरशातील असून सुट्टी घालवण्यासाठी त्यांच्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस अजूनही या घटनेची चौकशी करत आहेत.