हैदराबाद- कर्करोग हे नाव ऐकले तरी भल्याभल्यांची झोप उडते. कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यावर मृत्यू अटळ असल्याची भीती सर्वांमध्ये असते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीने स्वतःची इच्छा पूर्ण केली आहे. तेलंगणातल्या रचकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या या मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवले आहे. यामुळे तिचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. रम्या, असे त्या मुलीचे नाव आहे. यासाठी रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा -महाराष्ट्र-हरियाणा विधानसभा : जुन्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केली आपली ताकद
मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे खूप आनंद झाला असल्याचे रम्या सांगते. रम्या ही 12 वीत विज्ञान शाखेत शिकत आहे. रम्या रचाकोंडा आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली. तसेच तिने यावेळी अधिकाऱ्यांना आदेश देखील दिले. महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचे पालन केले. यावेळी तिने पोलीस आयुक्तांची वर्दीही परिधान केली होती.