तिरुअंनंतपूरम - एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मदरशामधील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना केरळमधील मल्लापूरम जिल्ह्यातील कोद्दूर येथे घडली. मोहम्मद रफिक, असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदरशामधील शिक्षक अटकेत - kerala crime news
मदरसा अनधिकृत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
![केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदरशामधील शिक्षक अटकेत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4536601-503-4536601-1569309213473.jpg)
प्रतिकात्मक फोटो
कारवाई करण्यात आलेला मदरसा अनधिकृत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मदरशामधील इतर १२ मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी 'चाईल्ड लाईन संस्थेने तक्रार दाखल केली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मदरशावर छापा मारला होता. अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या या मदरशावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.