महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खास कोरोना रुग्णांसाठी 17 राज्ये बनविणार रुग्णालये - कोरोनाव्हायरस सुरक्षा/ दक्षता

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सरकारने राबविलेल्या उपाययोजना प्रभावी असून जर नागरिकांनी त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले आहे

कोरोना
कोरोना

By

Published : Mar 26, 2020, 5:35 PM IST

नवी दिल्ली -आरोग्य मंत्रालयाच्या विनंतीनंतर 17 राज्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी वेगळे रुग्णालय बांधालयाला सुरुवात केली आहे. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढायला लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी विषेश रुग्णालय बांधण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्यांनी रुग्णालय बांधायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोनासंदर्भात देशातील परिस्थितीची माहिती दिली.

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सरकारने राबविलेल्या उपाययोजना प्रभावी असून जर नागरिकांनी त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आज सांगितले. तर नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकारे स्थलांतरीत नागरिकांना निवारा पुरवत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य शाळिला यांनी सांगितले.

मागील 24 तासात देशभरात 42 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत देशात 649 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 17 राज्यांनी रुग्णालय बांधायला सुरुवात केल्याची माहीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details