महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coronavirus : इंदोरमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांचा आकडा 44 वर - जागतिक आरोग्य आणीबाणी

मध्यप्रदेशात मजूर आणि कामगारांचे स्थलांतर पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. तसेच, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत.

इंदोर
इंदोर

By

Published : Mar 31, 2020, 3:24 PM IST

इंदोर (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशात इंदोरमध्ये मंगळवारी 17 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथे बाधित रुग्णांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. या सर्वांचे सॅम्पल्स दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल मिळाल्याचे इंदोरचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जाडिया यांनी सांगितले आहे.

मध्यप्रदेशात मजूर आणि कामगारांचे स्थलांतर पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. तसेच, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

मोरेना येथील जिल्हाधिकारी प्रियांका दास यांनी, गृहमंत्रालयाने दिलेल्या सर्व आदेशांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले. येथील कामगार आणि मजूरांचे स्थलांतर पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. यातील काही कामगार मोरेना जिल्ह्यातील आहेत आणि काही बाहेरून आलेले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details