महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणाच्या सुधारगृहातून १७ बालगुन्हेगार पळाले, तुरुंग कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जेव्हा सुधारगृहात जेवण दिले जात होते, तेव्हा काही बालगुन्हेगारांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या सुधारगृहात एकूण ९७ बालगुन्हेगार होते. त्यांना आटोक्यात आणल्यानंतर जेव्हा सर्व गदारोळ थांबला, तेव्हा यांपैकी १७ जण पळून गेल्याचे लक्षात आले.

17 juvenile inmates flee from observation home in Haryana
हरियाणाच्या सुधारगृहातून १७ बालगु्न्हेगार पसार

By

Published : Oct 13, 2020, 6:52 AM IST

चंदीगढ : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील एका सुधारगृहातून तब्बल १७ बालगुन्हेगार पळाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. ते ज्याप्रमाणे पळून गेले ते पाहता, गेल्या कित्येक दिवसांपासून ते याबाबत योजना करत होते असेही पोलीस म्हणाले. यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला असून, जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत.

हरियाणाच्या सुधारगृहातून १७ बालगु्न्हेगार पसार

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जेव्हा सुधारगृहात जेवण दिले जात होते, तेव्हा काही बालगुन्हेगारांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या सुधारगृहात एकूण ९७ बालगुन्हेगार होते. त्यांना आटोक्यात आणल्यानंतर जेव्हा सर्व गदारोळ थांबला, तेव्हा यांपैकी १७ जण पळून गेल्याचे लक्षात आले; असे स्टेशन हाऊस अधिकारी मनोज कुमार यादव यांनी सांगितले.

यापूर्वी २०१७मध्येही अशाच प्रकारे सहा बालगुन्हेगार या सुधारगृहातून पळून गेले होते.

हेही वाचा :विशेष : दृष्टीहीन, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण ठरलेले 'बाबा सूबा सिंह'

ABOUT THE AUTHOR

...view details