नवी दिल्ली - नजफगढ भागात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गोठ्यावरील पत्र्याचा छत कोसळला. यामध्ये १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ म्हशी गंभीर जखमी झाली आहेत.
मुसळधार पावसामुळे गोठ्याचा छत कोसळून १७ जनावरे दगावली, तर ५ म्हशी जखमी - नजफगढ
छतावर जनावरांसाठींचा चारा ठेवण्यात आला होता. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे छत कोसळले. यामध्ये चारा आणि पत्र्याखाली दबल्यामुळे १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
नजफगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बठींडातील भागत भाई का परिसरामध्ये जनावरांच्या सुरक्षेसाठी पत्र्याचे छत बांधण्यात आले होते. याखाली जनावरे बांधण्यात आली होती. छतावर जनावरांसाठींचा चारा ठेवण्यात आला होता. बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे छत कोसळले. यामध्ये चारा आणि पत्र्याखाली दबल्यामुळे १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. यावेळी छताखाली ७५ जनावरांना बांधण्यात आले होते.