काबुल (अफगानिस्तान) - तालिबान या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अफगानिस्तानचे 17 जवान ठार झाले आहेत. तर 11 सैनिक जखमी झाले आहेत. अफगानिस्तानच्या उत्तरेकडील कुंडूझ प्रांतांमध्ये बुधवारी पहाटे लष्करी छावण्यांवर तालिबानने हल्ला केला. सुरुवातीला कुंडूझ प्रांतामध्ये 5 अफगानी सैनिक मारले गेल, तर तलवका भागामध्ये 6 सैनिकांना दहशतवाद्यांनी ठार केले. तसेच पाच दहशतवाद्यांनाही अफगानी सैनिकांनी कंठस्नान घातले असल्याची माहिती अब्दुल कादीर या लष्करी अधिकाऱ्याने दिली.
तालिबानच्या हल्ल्यामध्ये अफगानिस्तानचे 17 सैनिक ठार, तर 11 जखमी - तालिबानी हल्ला
अफगानिस्तानच्या उत्तरेकडील ज्वाझन प्रांतामध्ये 12 अफगानी सैनिक मारले गेले, तसेच 5 दहशतवादी ठार झाले आहेत. अफगानी सैनिकांच्या बाला हिसार येथील लष्करी छावणीवर तालिबानने केलेल्या हल्ल्यामध्ये पाच सैनिक तर 10 दहशतवादी जखमी झाले आहेत. हा हल्ला अकचा जिल्ह्यामध्ये घडला.
तालिबानच्या हल्ल्यामध्ये अफगानिस्तानचे 17 सैनिक ठार तर 11 जखमी
अफगानिस्तानच्या उत्तरेकडील ज्वाझन प्रांतामध्ये 12 अफगानी सैनिक मारले गेले, तसेच 5 दहशतवादी ठार झाले आहेत. अफगानी सैनिकांच्या बाला हिसार येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यामध्ये पाच सैनिक तर 10 दहशतवादी जखमी झाले आहेत. हा हल्ला अकचा जिल्ह्यामध्ये घडला.