ढाका -कोरोनामुळे अनेक भारतीय नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटक बाहेरच्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत १६९ भारतीय नागरिकांना बांगलादेशच्या ढाका येथून आज परत आणले जाणार आहे. यामध्ये ११९ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
बांगलादेशात अडकलेले १६९ भारतीय मायदेशी परतणार; ११९ विद्यार्थिनींचा समावेश - भारतीय नागरिक मायदेशी
'वंदे भारत' मोहिमेअंतर्गत १६९ भारतीय नागरिकांना बांगलादेशच्या ढाका येथून आज परत आणले जाणार आहे. यामध्ये ११९ विद्यार्थीनींचा समावेश आहे. आज दुपारी या सर्वांना श्रीनगर विमानतळावर या नागरिकांना उतरवण्यात येणार आहे.

बांगलादेशात अडकलेल्या या १६९ जणांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे एक विशेष विमान आज दुपारी ढाक्यातून उडान घेईल. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर या नागरिकांना उतरवण्यात येणार आहे. "आम्ही प्राचार्य आणि भारतीय दुतावासाचे आभारी आहोत. त्यांनी आमची जबाबदारी घेत सुरक्षित मायदेशात पोहोचवण्याची व्यवस्था केली. आत्तापर्यंत बांगलादेश सरकारनेही आमची चांगली काळजी घेतली. त्यांचेही आभार", अशी प्रतिक्रिया आज भारतात येणाऱ्या विद्यार्थिनीने दिली.
ओमानमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी २० ते २३ मे दरम्यान स्पेशल विमाने पाठवण्यात येणार आहेत. ही विमाने बंगळूरू, कालीकत, कन्नूर, कोची आणि गया येथून उड्डाण करतील. वंदे भारत मोहिमेच्या दुसऱया टप्प्यात १४९ विमान फेऱ्या नियोजित असून ४० देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणले जाणार आहे.