मुजफ्फरनगर -सध्या देशभरात कोरोना विषाणूचे थैमान पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन सुरू असताना देखील महिलांवर, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत. अशीच एक लैंगिक अत्याचाराची घटना मुजफ्फरनगर येथे घडली आहे. येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुजफ्फरनगर पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशात 16 वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार - Teenager raped
पोलीस तपासानुसार, मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर लैंंगिक अत्याचार घडल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशात 16 वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार
मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी या घटनेचा शोध घेत आरोपीला अटक केली. पोलीस तपासानुसार, मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर लैंंगिक अत्याचार घडल्याचे समोर आले आहे.
Last Updated : Apr 20, 2020, 1:27 PM IST