महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पब्जी खेळताना 16 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - पबजी गेम

पब्जी गेम खेळत असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूमधील इरोड येथे घडली.

PUBG
PUBG

By

Published : May 20, 2020, 4:01 PM IST

हैदराबाद - पब्जी गेम खेळत असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूमधील इरोड येथे घडली. विशेष म्हणजे गेम खेळत असताना तरुणाला झटके येऊन तो बेशुद्ध झाला. कुटुंबीयांना लागलीच मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले आहे. सतीश कुमार असे मृत मुलाचे नाव आहे.

सतिश रविवारी आपल्या राहत्या घरी दुपारच्या जेवणानंतर मोबाईल फोनवर पब्जी गेम खेळत होता. गेम खेळत असताना अचानकपणे त्याला झटके आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. गेम खेळताना तो मोठ्याने इतर खेळाडूंवर ओरडू लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पब्जी खेळाचं व्यसन अवघ्या तरुणाईला लागलं आहे. पब्जीमध्ये तरुण-तरुणी इतके गर्क होऊन जातात, की त्यामुळे त्यांना बाहेरच्या वास्तव जगाचंही भान राहत नाही. मात्र, हा खेळ घातक रुप घेत आहे. या गेममुळे याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक मृत्यू ऑनलाईन व्हिडिओ गेम पब्जीमुळे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details