थिरुवनंतपुरम - केरळ राज्यातील मल्लापूरम येथील वालंचेरीमध्ये एका 16 वर्षीय मुलावर 16 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा... 5 हजार मुलींनी एकत्रित 'युवती सक्षमीकरणाचे' घेतले प्रशिक्षण; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
अब्दुल समद, शिवादासन, समीर, मोहम्मद कोया, मोईथीन कुट्टी, लियाकत, जलील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवादासन या व्यक्तीचे स्वतःचे रिक्षाचे गॅरेज आहे. त्या ठिकाणी आणि त्याच्या घरी, या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
हेही वाचा... कोरोना: चीनमध्ये ४१ जण दगावले, हजाराहून अधिक नागरिकांना संसर्ग
'चाईल्ड लाईन'च्या समुपदेशन दरम्यान ही घटना उघडकीस आली. यावेळी मुलाने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. केरळच्या कादमपुझा आणि जवळील भागात 16 लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलाने सांगितले. त्याच्या निवेदनानुसार चाइल्ड लाइन अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कादंबुझा आणि कल्पकचेरी येथे याबाबत 4 गुन्हे दाखल केले आहेत.