भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे १५०वे जयंती वर्ष. संपूर्ण भारतात उत्साहाने आज गांधी जयंती साजरी होत आहे. विविध उपक्रमांद्वारे लोक गांधीजींना श्रद्धांजली वाहत आहेत. विचार कधीही मरत नाहीत असे म्हणतात. गांधीजींच्या शिकवणींकडे पाहिल्यास या वाक्याची प्रचिती येते. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या शिकवणी आजही लोकांना योग्य मार्ग दाखवतात. गांधीवाद किंवा मॉडर्न भाषेमध्ये 'बापूगिरी'चे महत्त्व लोकांना पुन्हा नव्याने समजत आहे. सगळीकडे बऱ्याच प्रमाणात अनागोंदी आणि हिंसा पसरली असल्याच्या या काळात, लोकांना 'गांधीं'ची गरज भासत आहे.
बापूंच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, 'ईटीव्ही भारत'ने गांधी आणि आजची समाजव्यवस्था यांसंदर्भात एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. या लेखमालेमध्ये गांधींचे विचार, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांची कारणीमीमांसा तसेच बापूंबद्दल सामान्यांना माहित नसलेल्या गोष्टींचा समावेश होता. या लेखमालेसह, एक व्हिडिओ स्टोरीजची मालिकादेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये भारतातील विविध ठिकाणांशी गांधीजींच्या असलेल्या आठवणींचा समावेश होता.
पाहूया यांपैकी काही लेख आणि व्हिडिओ स्टोरीज...
१. महात्मा गांधींनी १९४२ ला 'चले-जाव'चा नारा दिला होता. ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, अमरावती जिल्ह्यातील यावली, बेनोडा तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी ही गावे पेटून उठली होती. याचवेळी वर्ध्यातील आष्टी शहीद गाव स्वातंत्र्य झाले होते. वाचा याची कथा..
ब्रिटिशांच्या बुलेटला गावकऱ्यांनी दिले दगडाने उत्तर; १९४२ ला स्वतंत्र झाले आष्टी शहीद गाव.
२. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...
VIDEO : महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि मी; काय म्हणतात अण्णा हजारे...
३. जाणून घ्या गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या देशोदेशींच्या नेत्यांबद्दल, आणि विविध अहिंसावादी आंदोलनांबद्दल..
गांधी १५० : गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले देशोदेशींचे 'गांधी'
४. गांधीजी आणि स्वातंत्र्य लढ्यावर अनेक पुस्तके लिहिलेले लेखक, रामचंद्र गुहा महिलांच्या सामाजिक उद्धारामध्ये असलेल्या गांधींच्या योगदानावर प्रकाश टाकत आहेत..
महिलांच्या सामाजिक स्वातंत्र्य आणि उद्धारामध्ये असलेले गांधींचे योगदान
५. गांधीजींचा आदर्शवाद आणि गांधीवादाबद्दल खुद्द गांधींंचे मत. तसेच, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलची त्यांची मते या सर्व गोष्टींबद्दलचा, प्रा. ए. प्रसन्न कुमार यांचा हा लेख..
महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी
६. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...
गांधी ही व्यक्ती नव्हे विचार - तुषार गांधी
७. गांधीजींच्या प्रभावामुळे, चंबळमधील कुख्यात अशा दरोडेखोरांनीदेखील अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता. जाणून घेऊया यामागची कथा...
गांधींपासून प्रेरणा घेऊन दरोडेखोरांनी स्वीकारला होता अहिंसेचा मार्ग
८. गांधीजींनी हरिजनांसाठी कशा प्रकारे विविध स्तरांवर लढा दिला, आणि फक्त लढा न देता विजयही मिळवला हे आपण पाहणार आहोत. हा लेख नचिकेता देसाई यांनी लिहिला आहे.