चंदीगढ - केंद्र सरकारच्या आदेशानुसार दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना माघारी येण्याची मुभा मिळाली आहे. त्यानुसार शुक्रवारी राजस्थानातून दीड हजार मजूर हरियाणात माघारी परतले आहेत. माघारी परतलेल्या नागरिकांना सिरसा जिल्ह्यातील राधा स्वामी सतसंग येथे ठेवण्यात आले आहे. कामगार, पर्यटक, मजूर या सर्वांनाच माघारी आणण्यासाठी राज्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
राजस्थानातून माघारी आले १ हजार ५०० मजूर
४० बसमधून दीड हजार मजूर राजस्थानातून हरियाणात माघारी परतलेल्या सर्व मजुरांची तपासणी करण्यात येणार आहे. जर कोरोनाची लक्षणे आढळून आली तर त्याला आयसोलेशन वार्डात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सर्व मजुरांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्वांना घरी सोडण्यात येणार आहे. सर्वांची चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांना होम-क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना घरी जाण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर सर्वच राज्यांनी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून त्या त्या राज्याशी संपर्क साधून माघारी आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.