जयपूर-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. दिवसागणीक कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे राजस्थान राज्यात कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी वैद्यकीय विभाग सतर्क आहे. कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास त्याला रुग्णालयात नेले जाते. त्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे अंदाजे राज्यात 1 हजार 500 रुग्णवाहिका अलर्ट मोडवर असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थानमध्ये 1500 रुग्णवाहिका अलर्ट मोडवर... हेही वाचा-मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
राजस्थान रुग्णवाहिका कर्मचारी युनियनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे 1 हजार 500 या 108-रुग्णवाहिका अलर्ट मोडवर आहेत. या रुग्णवाहिकांवर सुमारे 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णांची, संशयितांची माहिती मिळताच त्या काही वेळातच घटना स्थळी हजर होत आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 16 वा दिवस आहे.