जयपूर- राजस्थानातील प्रतापगढ आणि बासवाडा जिल्ह्यातील दीडशे नागरिक कुवैत देशात अडकून पडले आहेत. मात्र, तेथे त्यांचे अन्न-पाण्याविना हाल होत आहेत. यातील ५० नागरिक शाकाहारी असून त्यांचे सर्वात जास्त हाल होत आहेत.
राजस्थानातील दीडशे जण अडकले कुवैतमध्ये; अन्न,पाण्यावाचून होतायेत हाल - कुवैत बातमी
कोरोनामुळे सर्वजण कुवैतमध्ये अडकून पडले आहेत. त्यानंतर या सर्वांना जाबर स्टेडियम येथील ब्लॉक नंबर १ मध्ये हलविण्यात आले आहे.
![राजस्थानातील दीडशे जण अडकले कुवैतमध्ये; अन्न,पाण्यावाचून होतायेत हाल stranded in kuwait](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7005238-thumbnail-3x2-dd.jpg)
मुळचा प्रतापगड जिल्ह्यातील धरियावद येथील आणि आता कुवैतमध्ये अडकलेल्या निलेश कोठारीने मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे भारतीय दुतावास आणि सरकारची मदत मागितली होती. त्यानंतर थोडी परिस्थिती सुधारली होती. मात्र, तरीही शाकाहारी असलेल्यांना अन्न मिळत नाही.
कोरोनामुळे सर्वजण कुवैतमध्ये अडकून पडले आहेत. त्यानंतर या सर्वांना जाबर स्टेडियम येथील ब्लॉक नंबर १ मध्ये हलविण्यात आले आहे. मात्र, तेथे त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही, तसेचे शाकाहारी जेवण मिळत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.