मुझफ्फर नगर - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्टेशन हाऊस अधिकारी (एसएचओ) योगेश शर्मा यांनी माहिती दिली
उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल - अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात १५ वर्षीय मुलीवर तिच्याच गावातील एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात १५ वर्षीय मुलीवर तिच्याच गावातील एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. मंगळवारी आरोपीने मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाही, अशी धमकी दिली.
त्याबाबत कळल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी सदर आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती स्टेशन हाऊस अधिकारी शर्मा यांनी दिली.