चित्रकूट (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी आत्महत्या केली. चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अंकित मित्तल यांनी सांगितले की, माणिकपूर भागातील एका गावात 15 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
उत्तर प्रदेश : चित्रकूटमध्ये बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या - चित्रकूट पोलीस बातमी
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी आत्महत्या केली.
दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी जवळच्या जंगलात तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर पीडित कुटुंबीयांनी यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. यावरून त्या गावच्या सरपंचाचा मुलगा किशन उपाध्याय यासह आशिष आणि सतिश या तिघांना विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
बलात्कारानंतर पीडित मुलीची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असून, यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
शवविच्छेदन तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली नसून, आता हे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठवणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. यासंदर्भातला अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.