महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2019, 9:40 AM IST

ETV Bharat / bharat

बालविवाह रोखण्यासाठी 'ती' पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या दारात

बालविवाह करण्यास भाग पाडणाऱ्या वडिलांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एका पंधरा वर्षीय मुलीने थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दरवाजा ठोठावला. ही पंधरा वर्षीय मुलगी सोमवारी आपल्या काकांसोबत गेहलोतांच्या 'जन सुनवाई' या कार्यक्रमात पोहोचली. वडील लग्न करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचे तिने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र

जयपूर - बालविवाह करण्यास भाग पाडणाऱ्या वडिलांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एका पंधरा वर्षीय मुलीने थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दरवाजा ठोठावला. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील ही मुलगी आहे.


ही पंधरा वर्षीय मुलगी सोमवारी आपल्या काकांसोबत गेहलोतांच्या 'जन सुनवाई' या कार्यक्रमात पोहोचली. वडील लग्न करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचे तिने मुख्यमंत्र्यांना सांगितले. तक्रारदार मुलीच्या आईचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली.

हेेही वाचा - बिल गेट्स यांनी अभिजित बॅनर्जी यांचे केले कौतूक, म्हणाले...'नोबेल विजेत्यांच्या कार्यामधून बरचं शिकायला मिळालं'


मुलीची तक्रार ऐकल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुलीला मदतीचे आश्वासन दिले. टोंक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी 'शारदा बालिका निवासी शाळा' या योजने अंतर्गत पुढील शिक्षणासाठी मदतही देऊ केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details