महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'त्या' 15 मिनिटांत माणसाची वृत्ती समजली, गौतम गंभीरने इम्रान खान यांना फटकारले

'प्रत्येक देशाला १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यात ज्या-ज्या देशाकडून जे-जे म्हणणे मांडण्यात आले, त्यावरून त्यांची वृत्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता आणि विकासावर बातचित केली केली. तसेच, पाकिस्तानी सैन्याच्या कळसूत्री बाहुलीने अणुयुद्धाची धमकी दिली. हीच तीच व्यक्ती आहे, जिने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली होती,' असे ट्विट गंभीर याने केले आहे.

गौतम गंभीर

By

Published : Sep 28, 2019, 10:10 PM IST

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. यानंतर भाजप खासदार गौतम गंभीर याने इम्रान खान यांना जोरदार फटकारले आहे. गौतम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाक पंतप्रधानांच्या बोलण्यातील विसंगती दाखवून दिली.

'प्रत्येक देशाला १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यात ज्या-ज्या देशाकडून जे-जे म्हणणे मांडण्यात आले, त्यावरून त्यांची वृत्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता आणि विकासावर बातचित केली केली. तसेच, पाकिस्तानी सैन्याच्या कळसूत्री बाहुलीने अणुयुद्धाची धमकी दिली. हीच तीच व्यक्ती आहे, जिने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली होती,' असे ट्विट गंभीर याने केले आहे.

गौतम गंभीर आणि पाक पंतप्रधान इम्रान खान हे दोघेही माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आपापल्या देशांच्या क्रिकेट संघातून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.

शुक्रवारी, यूएनजीएमध्ये बोलताना इम्रान खान यांनी पाकिस्तानचा पारंपरिक शत्रू असलेल्या भारताशी काश्मीर मुद्द्यावरून युद्ध करण्याची धमकी दिली होती. शेजारी आणि अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांमध्ये काश्मीर मुद्द्यावर अणुयुद्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते. येथील परिस्थिती हातातून निसटत चालली असून याचे सीमेपलीकडे भयंकर परिणाम होतील, असे खान म्हणाले होते. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे आणि जम्मू काश्मीरची पुनरर्चना करणे, हा भारताने एकतर्फी घेतलेला निर्णय असल्याचे ते म्हणाले होते.

इम्रान खान यांनी जम्मू-काश्मीर येथील रक्तपाताचे आणि दहशतवादाचे झोंबणारे वर्णन करत भारतावर हल्ला चढवला. हे भाषण त्यांना देण्यात आलेल्या १५ मिनिटांहून अधिक वेळ चालले. त्यानंतर भारताकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. 'भारताशी पारंपरिक युद्ध सुरू झाल्यास काहीही होऊ शकते. असे झाल्यास आमच्यासमोर पर्याय उरणार नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू,' असे खान म्हणाले होते.

फेब्रुवारीमध्ये भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे हे भयंकर हत्याकांड घडवून आणण्यात आले होते. यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यानचे संबंध ताणले गेले होते. यानंतर ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी आर्टिकल ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेने घेतला. यानंतर पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी भारतात वारंवार घुसखोरी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details