बीजापूर - छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये २ माओवाद्यांता खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. एक लाख रुपयांचे इनाम असलेल्या महिला माओवाद्यासह १५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
बीजापूरमध्ये इनाम असलेल्या महिलेसह १५ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
आत्मसमर्पण करणाऱ्या १५ माओवाद्यांमध्ये ३ पुरुषांनी ३ भरमार बंदूकींसह समर्पण केले. आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये एक सीएनएम अध्यक्ष, ५ मिलिशिया सदस्य, ८ डीकेएएमएस अध्यक्ष आणि एका आरपीसी सदस्याचा समावेश आहे.
१५ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
आत्मसमर्पण करणाऱ्या १५ माओवाद्यांमध्ये ३ पुरुषांनी ३ भरमार बंदूकींसह समर्पण केले. आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये एक सीएनएम अध्यक्ष, ५ मिलिशिया सदस्य, ८ डीकेएएमएस अध्यक्ष आणि एका आरपीसी सदस्याचा समावेश आहे.
या माओवाद्यांनी बीजापूरचे पोलीस अधीक्षक गोवर्धन ठाकूर आणि सीआरपीएफ ८५ बटालियनचे कमांडिंग ऑफिसर सुधीर कुमार यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.