रायपूर- भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. छत्तीसगडमध्ये मात्र आधीच स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. रायपूरमध्ये तब्बल १५ किलोमीटर लांब तिरंगा हातात धरून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुरक्षा दल, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. मानवी साखळी बनवत विद्यार्थी, नागरिक आणि जवान तिरंगा घेवून रस्त्यावर उतरले होते.
तयारी स्वातंत्र्य दिनाची; १५ किलोमीटर लांबीचा तिरंगा घेऊन छत्तीसगडमध्ये निघाली रॅली
रायपूरमध्ये तब्बल १५ किलोमीटर लांब तिरंगा हातात धरून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुरक्षा दल, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.
रॅली
येत्या गुरुवारी भारताचा स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) देशभरात उत्साहात साजरा केला जाईल. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.