महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तबलिगी मरकज: विदेशी 15 नागरिक वझीराबादच्या मशिदीत सापडले.. पैकी 12 जण इंडोनेशियातील

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये हजारो लोक उपस्थित होते. यात अनेक परदेशी नागरिकांचीही समावेश होता. त्यामुळे त्या परदेशी नागरिकांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी वझीराबाद परिसराच्या रस्ता क्रमांक 9 मधील जामा मशिदीत 15 विदेशी नागरिक लपले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यापैकी 12 जण इंडोनेशियातील आहेत.

By

Published : Apr 1, 2020, 1:35 PM IST

विदेशी 15 नागरिक वझीराबादच्या मशिदीत सापडले..
विदेशी 15 नागरिक वझीराबादच्या मशिदीत सापडले..

नई दिल्ली-वझीराबाद गल्ली क्रमांक-9 मध्ये जामा मशिदीत मंगळवारी दुपारी 15 परदेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पैकी 12 नागरिक इंडोनेशियातील असल्याचे सांगितले जात आहे. हे नागरिक दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंर ते मशिदीमध्ये थांबले होते.

विदेशी 15 नागरिक वझीराबादच्या मशिदीत सापडले..
हेही वाचा-फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४९९ बळी!

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये हजारो लोक उपस्थित होते. यात अनेक परदेशी नागरिकांचीही समावेश होता. त्यामुळे त्या परदेशी नागरिकांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी वझीराबाद परिसराच्या रस्ता क्रमांक 9 मधील जामा मशिदीत 15 विदेशी नागरिक लपले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यापैकी 12 जण इंडोनेशियातील आहेत.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details